अंध विद्यार्थ्यांच्या ऑडिओ बुकसाठी एक सुंदर उपक्रम एका विद्यार्थी मित्राने सुरू केला आहे, राज्यभर राबविला जावा यासाठी तो शासन दरबारी फेऱ्या ही मारतोय

Wednesday, 03 Feb, 1.34 pm

तुम्हांला चांगल्या कल्पना सुचणे ही मोठी संपत्ती आहे आणि त्या कल्पना तुम्ही सामाजिक कामांसाठी वापरणे ही मोठी कौतुकाची बाब आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फिजिक्स विषयात एमएससी करत असलेल्या विशाल पालवे या विद्यार्थी मित्राकडे अशा काही अभिनव कल्पना आहेत. त्यातून अंध विद्यार्थ्यांच्या ऑडिओ बुकसाठी त्याने सुंदर उपक्रम ही सुरू केला आहे. काय आहे हा उपक्रम त्याच्याकडूनच समजून घेऊयात.

विशाल पालवे

कोरोनाच्या साथीमुळे देशभर 24 मार्च 2020 रोजी लॉकडाउन जाहीर केले गेला, तेव्हा लेट्स रेकॉर्ड नावाचा एक उपक्रम सुरू करण्यात आला , लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 8 तासात भारतात सुरू झालेल्या काही चांगल्या उपक्रमांपैकी Lets Record ( https://vargshikshak.com/lets-record/ ) हा एक आहे.